आमदार पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
   आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील समस्या जाणून घेण्याकरिता सर्व प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
     यावेळी महसूल विभागाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जत तालुक्यातील विविध समस्या जाणून घेण्याकरिता आढावा बैठकीचे आयोजन दि. १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय आवारातील "तलाठी हॉल" येथे  केले आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख, महावितरण इत्यादी कार्यालयांच्या विरुद्ध ज्या काही समस्या असतील, तक्रारी असतील त्यांनी स्वतः उपस्थित राहून लेखी स्वरूपात अथवा तोंडी स्वरूपात प्रश्न मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर बैठकीस येत असताना नागरिकांनी आपले कार्यालयाशी निगडित नोटीस दोन प्रतीत आणाव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन