सिद्धनाथ हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक पदाची नेमणूक करा; आशिष शिंदे सरकार
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील श्री सिद्धनाथ हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक पदाची नेमणूक करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे युवा नेते आशिष शिंदे सरकार यांनी केली आहे. लेखी निवेदन गट शिक्षण अधिकारी यांना जत पंचायत समिती येथे देण्यात आले आहे. यावेळी युवक नेते विक्रम ढोणे, सागर कांबळे उपस्थित होते. निवेदन गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सर शेख यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील श्री सिद्धनाथ हायस्कुलमध्ये इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सध्या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यासाठी मुख्याध्यापक यांची आवश्यकता आहे. मात्र या पदाचा कार्यभार सध्या कोणाकडेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत आहेत. पुढील शिक्षणासाठी बोनाफाईड, दाखले यासाठी मुख्याध्यापक यांचे सह्याचे अधिकार कोणाकडेच नसल्याने अडचणी येत आहेत. तरी तातडीने मुख्याध्यापक पदाची नेमणूक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी लेखी निवेदन सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे तात्काळ पाठवून देण्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
Comments
Post a Comment