तुकाराम महाराजांच्या सततच्या प्रयत्नामुळे म्हैशाळ विस्तारित योजनेचे काम सुरू झाल्याबद्दल व्हसपेठ ग्रामस्थांकडून तुकाराम बाबांचा सत्कार
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला. शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. बाबांच्या या लढ्याला, पाठपुराव्याला यश आले असून माडग्याळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. व्हसपेठ भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याने व्हसपेठ ग्रामस्थांच्या वतीने तुकाराम बाबांचा सत्कार करण्यात आला.
व्हसपेठ ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामण्णा सुतार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हसपेठच्या सरपंच पूनम तुराई, उपसरपंच अर्चना घोदे , ग्रामपंचायत सदस्य शानूर नदाफ, संगीता हुवाळे , सुमन जाधव, भगवान तुराई, माजी सरपंच राम साळूंखे, सुखदेव साळूंखे, बिराप्पा शिवाजी निळे, संभाजी लेंगरे, अबाजी वगरे, वसंत निळे, अमन शेख, अशोक निळे, राजू धोंडमनी, बिराप्पा निळे, बटू सनदी,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामण्णा सुतार, व्हसपेठच्या सरपंच पूनम तुराई, उपसरपंच अर्चना घोदे म्हणाले, बाबांच्या नेतृत्वाखाली अंकलगी येथे आमरण उपोषण, रक्त घ्या, पाणी द्या आंदोलन, रस्ता रोको केला. बाबांनी या मागणीसाठी शासन, प्रशासनाकडे राजकारणविरहित लढा उभा उभारला वेळप्रसंगी टिका, टिप्पणी सहन केली पण पाण्याचा हा लढा सुरु ठेवला म्हणून आज काम सुरू झाले. यापुढेही बाबांच्या कार्यात आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी होवू अशी ग्वाही दिली. व्हसपेठ गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बाबांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राजकारणविरहित लढा सुरूच राहणार; तुकाराम बाबा-
कोणी निंदा, कोणी वंदा जतच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी गेले पाहिजे ही आपली भावना आहे. जतला द्यायला पाणी नव्हते असे असली तरी आपणास पाणी देण्याचे कोरडे आश्वासन दिले जायचे. संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी नंतर पाणीच नसल्याचे उघड झाले व त्यानंतर जतला पाणी आरक्षित करण्यात आले. पाण्यासाठीचा हा आपला राजकारणविरहित लढा असाच सुरू राहणार आहे. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी केले.
Comments
Post a Comment