नूतन अध्यक्षाने येळदरी शाळेत 25 हजाराचा डीजे साऊंड व ऍम्प्लिफायर दिला भेट


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळदरी येथील शालेय व्यवस्थापन समितीची पदाधिकारी निवड नुकतीच पार पडली या निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून सिद्धपा भीमाण्णा चौगुले यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी आपल्या मनोगतात शाळेसाठी भरभरून मदत करेन व शाळेचा विकास भौतिक सुविधा मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करीन असे अभिवचन दिले व प्रत्यक्ष आपल्या कृतीतून शाळेला आवश्यक असणारे रुपये पंचवीस हजार वस्तू दोन साऊंड बॉक्स व एक मोठा ऍम्प्लिफायर त्यांनी आजच खरेदी करून शाळेत भेट दिला .
     या त्यांच्या कामाच्या सिंघम स्टाईलचे गावातून कौतुक होत आहे व त्यांनी दाखवलेली दानशूर वृत्ती शाळेबद्दल प्रेम व सहकार्याची भावना या त्यांच्या कृतीतून दिसून येते.त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी काम केले तर शाळेचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही यावेळी मुख्याध्यापक दीपक सुर्वे सर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले यावेळी पिराजी वाघमारे वीरभद्र कांबळे संभाजी सरगर प्रकाश सरगर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन