९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापूर्वी जातीचे दाखले न मिळाल्यास प्रांत कार्यालयावर आदिवासी समाजाचा अर्ध नग्न मोर्चा काढण्याचा इशारा; बसवराज चव्हाण

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी कार्यालय जत येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील दुष्काळी भागातील व इतर बहुजन समाजातील अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी जत मधील आदिवासी पारधी समाजाच्या अडचणी आमदार पडळकर यांच्यासमोर मांडल्या. यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे, मुख्याधिकारी कुंभार तसेच इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
     यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलताना बसवराज चव्हाण म्हणाले की, आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले देण्यासंदर्भात प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून आदिवासी पारधी समाजाला जातीचे दाखले तातडीने द्यावे असा आदेश असताना गेले दीड ते दोन वर्ष या समाजाला दाखले दिले जात नाहीत. त्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना असतील, घरकुल मुलांच्या शिक्षणासाठी व नोकरी संदर्भात जातीचे दाखले असणे गरजेचे आहे. वारंवार प्रांत ऑफिस यांच्याशी पत्र व्यवहार करून देखील आदिवासी पारधी समाजाला दाखले दिले जात नाहीत. याविषयी प्रांत अधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी १५ ऑगस्ट पूर्वी तालुक्यातील सर्व आदिवासी पारधी बांधवांना जातीचे दाखले दिले जातील असे आश्वासन देण्यात आले. परंतु चव्हाण यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापूर्वी जातीच्या दाखल्यांची मागणी केली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर आदिवासी समाजाचा अर्ध नग्न मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
     यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, आकाराम मासाळ, युवराज निकम, लक्ष्मण जखगुंड अनिल पाटील व इतर मान्यवर या  आढावा बैठकिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष