जत येथे प्रकाश जमदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच जत तालुक्यातील जनतेचे खंबीर नेतृत्व प्रकाशराव जमदाडे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण शनिवार दि. ३१ ऑगष्ट रोजी विविध मान्यवरांच्याहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, भाजप संघटक मकरंद देशपांडे, समन्वयक शेखर इनामदार, सिमेंट कॉर्पोरेशन सदस्य डॉ. रवींद्र आरळी, माजी शहर जिल्हाध्य दीपक म्हैशाळकर, राज्य कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील शेतकरी सर्व सामान्य जनता, माता भगिनी यांचे विविध विभागातील सरकारी योजना, शेतकरी बांधव यांचेसाठी विविध योजना तसेंच विविध महामंडळ, शासकीय योजना जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे माध्यमातून कर्ज पुरवठा महिला अल्पबचत गट यांच्या योजना, लडकी बहीण योजना तसेंच तालुक्यातील तरुण बेरोजगार युवक व युवती यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तसेंच कामगार नोंदणी करून त्यांना शासकीय विविध योजना यांचा लाभ देण्यासाठी एका छताखाली सर्व सामान्य नागरिक महिला बहुजन वंचित यांच्या कामाच्या दृष्टिकोनातून हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे. शहरातील डफळे कॉलनी पोलीस स्टेशन पाठीमागे हे कार्यालय सुरू होत आहे.
या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास भारतीय जनता पार्टी व प्रकाश जमदाडे जनसंपर्क कार्यालयचा उदघाटन सोहळा सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी यांचे उपस्थित शनिवारी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होतं आहे तरी या उदघाटन प्रसंगी जत तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे अहवान जमदाडे यांनी केला आहे.
Comments
Post a Comment