राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. तानाजी चौगले
राजे रामराव महाविद्यालयात सातदिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेला प्रारंभ
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयामार्फत चालवली जाणारी भारतातील सर्वांत मोठी युवकांची संघटना असून याअंतर्गत देशभरातील ४५ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचे संघटन झाले आहे. सामुदायिक सेवेद्वारे व्यक्तिमत्त्व विकास, वृक्षारोपण, जलसंधारण, श्रमसंस्कार शिबिर, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, संभाषण कौशल्य, ग्रामीण जन जीवनाचा अनुभव अशा कामांमुळे राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.तानाजी चौगले यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन व सातदिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी "राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका" या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ. भिमाशंकर डहाळके व डॉ.राजेंद्र लवटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.तानाजी चौगुले पुढे म्हणाले की, राष्ट्रीय एकता शिबिर, साहसी शिबिर, प्रजासत्ताक दिन शिबिर, राज्यस्तरीय गड संवर्धन, स्वच्छ भारत, जल संवर्धन शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक महाविद्यालयीन स्तरापासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम करू शकतो. यामधून प्रगल्भ राष्ट्रभक्ती, एकता, एकात्मता, समाजसेवा व नेतृत्व गुण तयार होतात. याचाच फायदा भावी नागरिक घडविण्यामध्ये होतो. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा व सहभागी होऊन कार्य करावे, असे आव्हानही यावेळी प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ.भिमाशंकर डहाळके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सतिशकुमार पडोळकर तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी, कार्यक्रम अधिकारी प्रा.तुकाराम सन्नके, राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्रा.कुमार इंगळे, प्रा.धनंजय वाघमोडे, प्रा.तेजस गवळी, प्रा. पठाण, डॉ.यादवराव मोरे, प्रा.विशाल गोडबोले, महाविद्यालयातील इतर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment