लोकनेते स्वर्गीय बी.आर. काका शिंदे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    लोकनेते स्वर्गीय बी.आर. काका शिंदे यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी ८ ऑगष्ट रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिर व सायंकाळी ६ वा. सुरेल भक्ती-भाव गीतांचा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रमसिंह सावंत हे उपस्थित राहणार असून प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
    यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जत मार्केट यार्ड येथील बी.आर. काका यांच्या पुतळ्याचे सकाळी साडेनऊ वाजता पूजन व त्यानंतर वरील कार्यक्रमास सुरुवात होईल. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुजय शिंदे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण