जत भाजपा करणार तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांचा सत्कार; बसवराज पाटील यांची माहिती
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातील सर्व पोलीस पाटलांचे मानधन ६५०० वरून वाढवून १५००० रुपये केले केले आहे. जत तालुक्यात असलेले १२३ गावातील सर्व पोलीस पाटलांचे भारतीय जनता पार्टी व तम्मनगौडा रवीपाटील युथ फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
अशी माहिती सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली आहे.
जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा तालुका असून कायम दुष्काळी तालुका आहे. जत तालुक्यातील गावोगावचे पोलीस पाटील गाव संरक्षण करत असतात त्यामुळे त्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो. ६५०० चे मानधन त्यांना पुरेसे नाही हे लक्षात घेऊन गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना १५००० रुपयांचे मानधन जाहीर केले आहे. जत तालुक्यातील पोलीस पाटील जत शहरात दर महिन्याला मीटिंगसाठी येतात याठिकाणी बैठक घेण्यासाठी कोठेही सभागृहाची उपलब्धता नाही म्हणून त्यांना बैठक घेण्यासाठी सुसज्ज असा पोलीस पाटील भवन लवकरच मंजूर करून देण्यासाठी भाजपाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील हे पाठपुरावा करणार आहेत.
तसेच जत तालुक्यातील पोलीस पाटलांचे अनेक गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. अशा रिक्त पदांवर पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यासाठी तम्मणगौडा रवीपाटील हे राज्य शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना भारतीय जनता पार्टीच्या जत शहरातील वॉर रूम येथे बोलवून सर्व पोलीस पाटलांचे भाजपा व तम्मनगौडा रवी पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी वॉर रूम येथे येऊन आमच्या शुभेच्छा स्वीकारावेत असे आवाहन सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली आहे. यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी रामचंद्र पाटील व कामण्णा बंडगर उपस्थित होते.

Comments
Post a Comment