राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     राजे रामराव महाविदयालय, जत येथे महाविद्यालयातील आर्टस्, कॉमर्स, सायन्स व ज्युनियर विभागामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने  'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज महा‌विद्यालयातील अध्यापनाचे कामकाज विद्यार्थी शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावून अध्यापन कार्याचा आनंद अनुभवला. यावेळी सकाळ सत्रामध्ये प्राचार्य म्हणून कु.अक्षता व्हनखंडे तर दुपार सत्रामध्ये कु.वैष्णवी भोसले हिने कामकाज पाहिले. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी विद्यार्थीनी सर्व प्राध्यापकांचा सत्कार केला. 
     याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, भारतामध्ये गुरु-शिष्य हि परंपरा फार प्राचीन आहे. जीवनामध्ये जे जे आपल्याला मार्ग दाखवितात, मार्गदर्शन करतात ते ते सर्व आपले गुरु आहेत. म्हणून आजचा दिवस हा आपल्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस आहे. आई-वडील व शिक्षक हेच माणसाच्या जीवनाचे  शिल्पकार आहेत,असे सांगून ते शेवटी म्हणाले की, आपल्या जीवनाला दिशा देण्यात गुरूचा वाटा मोठा असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचा नेहमी आदरपूर्वक  सन्मान केला करुन आपल्या अंगी असणाऱ्या कला-कौशल्यांचा विकास केल्यास जीवनप्रवास सुखकर होईल, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी सकाळ सत्रातील समारंभाचे अध्यक्ष म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भिमाशंकर डहाळके तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.रामदास बनसोडे तर दुपार सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश उर्फ मल्लापा सज्जन तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे उपस्थित होते. सायन्स विभागाच्या कार्यक्रमाची सुरुवात कु.समृध्दी शिंदे व कु.सोनाली भिराडकर यांच्या स्वागत गीतानी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.प्रकाश सज्जन, प्रा.लक्ष्मण भरगंडे, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर कांबळे मनोगते व्यक्त केली. तर यावेळी कु.श्रावणी कांबळे, कु.सावित्री बिराजदार, कु.विद्या जाधव, कु.शिवाजंली चिंतामणी, कु.रुक्मिणी कुंभार, कु.ऋतुजा शिंदे(भौतिकशास्त्र विभाग) श्री.अभिषेक माने या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक म्हणून आज आलेले अनुभव सांगितले. तसेच भौतिकशास्त्र विभागाच्या वतीनेही शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.सुरेश बामणे तर अध्यक्ष म्हणून प्रा.मयुर अंकलगी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्योती शिंदे हिने तर आभार कु. सुवर्णा सावंत हिने मानले.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतिशकुमार पडोळकर व विभागातील सदस्य, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी  परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ‌.सतिशकुमार पडोळकर यांनी केले. सकाळ सत्रामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सानिका लवटे हिने तर आभार कु.अंकिता व्हनखंडे हिने मानले. तर दुपारच्या सत्रामध्ये सुत्रसंचलन श्री.लियाकत हैद्राबादे व मल्लिकार्जुन चमकेरी यांनी तर आभार कु.भूमी पाथरुट हिने मानले. या समारंभासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष