जत तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करणार : मन्सूर खतीब

उबाठाच्या दिनकर पतंगेंसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


जतवार्ता न्यूज नेटवर्क;

    आगामी जत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकत सर्वांना दाखवून देऊ, पक्षाने संधी दिल्यास ही जागा आम्ही निश्चित लढाऊ. पक्षाला मानणारा जत तालुक्यात मोठा वर्ग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तालुक्यात राष्ट्रवादीचे जाळे भक्कम केले जात आहे. तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करणार असल्याचे मत सांगली जिल्हा बँकेचे संचालक तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब यांनी केले.

    जत येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनकर पतंगे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर विठ्ठल कोळी, शिवानंद तिकुंडी, महावीर मडीमनी, अब्बास मुजावर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. सांगली कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, सांगली जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, मच्छिद्र वाघमोडे, पापा हुजरे यांच्या उपस्थितीत जतच्या राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला. सुरेश शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. तसेच पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकत्रीत काम करू असे सांगितले.


उबाठाला जय महाराष्ट्र;

      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जेष्ठ नेते दिनकर पतंगे यांनी उबाठाला अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांच्यासोबत खाद्याला खांदा लावून काम करत जत तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिनकर पतंगे यांनी पक्षप्रवेशावेळी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण