जत तालुक्यातील ५१ हुन अधिक गणेश मंडळाना श्री ची मूर्ती भेट; एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य; तुकाराम बाबा महाराज
५१ हजार टी शर्ट चे वाटप सुरू; बागडेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्य उद्या काल्याचे कीर्तन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री च्या मुर्त्या मोफत भेट देण्यात आल्या. बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य चिक्कलगी भुयार येथे संगीतमय भागवत कथा व गोंधळेवाडी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सोमवारी काल्याच्या किर्तनाने पुण्यतिथी सोहळयाची सांगता होणार आहे.
श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य मागील १४ वर्षांपासून एक गाव एक गणपती राबविणाऱ्या गणेश मंडळाला श्री ची मूर्ती भेट देणारे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने याहीवर्षी जत तालुक्यातील ५१ हुन अधिक गणेश मंडळाना श्री ची मूर्ती भेट दिली आहे. यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आले आहे. एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावाला तुकाराम बाबा यांच्याकडून ११ हजार रुपये रोख तसेच श्री संत सयाजी बागडेबाबा सन्मान पुरस्कार-२०२४ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
एक गाव एक गणपती बरोबर व तालुक्यात ५१ हजार टी शर्ट तसेच अन्य सहकार्य करण्यात येणार आहे. पाच फुटाहून अधिक उंची असलेल्या मुर्त्या मंडळाला देण्यात आल्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणपतीचे स्वागत केले. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
संख येथील बाबा आश्रमात हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्री च्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे ओएसडी अमोल डफळे, पुणे येथील मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ, शिक्षक नेते भारत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तुकाराम बाबांचे गणरायाला दुष्काळमुक्तीची साकडे;
मागील वर्षी पावसाने दडी दिल्याने यंदा तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. म्हैसाळचे पाणी ज्या गतीने तालुक्यात पोहचायला हवे होते ते न पोहचल्याने आजही स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही जतकर दुष्काळाशी दोन हात करत आहेत हे दुर्देव आहे. सध्या विस्तारित म्हैसाळ योजना तसेच माडग्याळ ते अंकलगीचे काम सुरू आहे. ही सर्व कामे मार्गी लागू दे जतचा दुष्काळ कायमचा हटू दे असे साकडे घालत हभप तुकाराम बाबा यांनी गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
तुकाराम बाबांचे कार्य कौतुकास्पद- अमोल डफळे;
कोरोना, महापूर, अपघात घडो की अन्य कोणतीही दुर्देवी घटना घडली की श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे मदत नव्हे कर्तव्य म्हणून काम करतात. अध्यात्म व सामाजिक कार्यातील बाबांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अमोल डफळे यांनी केले.
बागडेबाबांच्या पुण्यतिथीची काल्याच्या किर्तनाने सांगता;
चिक्कलगी भुयार व गोंधळेवाडीत सोमवारी (दि.९) बागडेबाबा पुण्यतिथीनिमित्य काल्याचे किर्तननाने सांगता होणार आहे. देवाची आळंदी येथील शिवाजी महाराज वटंबे यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता फुले व गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दरम्यान रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज ,दादा काटे महाराज जवळा, अमृत पाटील जाल्याळ यांनी केले आहे.

Comments
Post a Comment