जत नगरिची ग्रामदेवता, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.यल्लमादेवी व डोंगरनिवासिनी श्री.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती, भजन,आरती,जोगव्याने भाविक मंत्रमुग्ध


जतवार्ता न्यूज नेटवर्क;

    जत नगरिची ग्रामदेवता श्री.यल्लमादेवीचे मंदिरावर नवरात्रीनिमित्त अकर्षक अशी विध्दूत रोषणाई केल्याने हे मंदीर रोषणाईने फुलून गेले आहे. नवरात्रीत दररोज पहाटे साडेपाच वाजता आरती करण्यात येते तत्पूर्वी देवीचे पूजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी हे देवीची विधिवत पूजा करतात. त्यानंतर देवीच्या जोगतीनी रंजना पवार व सहकारी हे देवीचा जागर करतात. यावेळी मोठ्यासंख्येने भक्तगण उपस्थित राहून रांगेणे देवीचे दर्शन घेतात.

   श्री.यल्लमादेवीची आरती झाल्यानंतर भक्तगण हे डोंगरनिवासिनी श्री.अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जातात. दररोज पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी जाणा-या व दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविक भक्तांची मोठी गर्दी रस्त्यावर दिसते.

   श्री. अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्यावतीने श्री.अंबाबाई डोंगरावरील देवीच्या मंदिरात दररोज देविची विधिवत पूजा करण्यात येते देवीचे पौरोहीत करणारे अनिल देशपांडे व भूषण साळे व अथर्व देशपांडे हे दररोज श्री.नवदुर्गाचे दर्शन घडवितात. देवीची आरती ही नवरात्रीत दररोज सकाळी साडेसात वाजता करण्यात येते. तत्पूर्वी  देवीची विधिवत पूजा करण्यात येते. त्यानंतर भजनीमंडळींचा भजनाचा कार्यक्रम चालतो भजनानंतर देवीची आरती व जोगवा होऊन भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. मंडळाचे अध्यक्ष शहाजीबापू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे शंभरवर सभासद हे सेवेकरी म्हणून काम करित आहेत. 

   मंडळाच्यावतीने नवरात्रीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन,रात्री ८ वाजता घागरी फुंकणे, दिवटी उत्सव व गोंधळ व जागरणाचा कार्यक्रम होतो. शनिवार दि.१२  ऑक्टोबर रोजी सकाळी ७ .३० वाजता नवरात्रौत्थापन, अभिषेक व सालंकृत पूजा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुरुवार दि.१७ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णीमा असल्याने सकाळी ७.३० वा.श्री.अंबाबाई देवीची अभिषेक महापूजा ,त्यानंतर देवी सहस्त्र नामावली पठण व दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

    श्री.अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने महिलांसाठी दुर्गा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शेकडो स्पर्धकानी सहभाग नोंदविला त्यांना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तर विजयी स्पर्धकांना ट्राॅफी ,प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. नवरात्रीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे व पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तर जत एस.टी.आगाराने नवरात्रीसाठी सकाळी व संध्याकाळी भाविकांसाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. नवरात्रीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष