जत येथे माळरान कृषी प्रदर्शनास सुरवात; खा.विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
माळरान कृषी २०२४ या भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे उदघाटन खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. जत तालुक्यातील जनतेसाठी हा महोत्सव सलग चार दिवस चालणार आहे. या प्रदर्शनामध्ये ३०० हून अधिक स्टॉल्सची सोय करण्यात आली आहे, ज्यात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषी साधने, नवतंत्रज्ञानावर आधारित कृषी यंत्रे व उत्पादनांच्या प्रदर्शनाचा समावेश आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या माळरान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधीबरोबरच महिलांसाठी बचत गट व लघू उद्योगांना प्रोत्साहन देणारे कर्ज प्रकरणांचे मार्गदर्शनदेखील होणार आहे. याशिवाय, मेंढी व शेळी प्रदर्शन, कृषी नवकल्पना, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचादेखील आनंद सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व जतकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावावी. असे आवाहन आमदार सावंत यांनी केले आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, सभापती सुजय शिंदे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक, आप्पाराय बिराजदार आदीजन उपस्थित होते.

Comments
Post a Comment