अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसात तक्रार देऊनही कारवाई करत नसलेने नातेवाईकांचा उपोषणास बसण्याचा इशारा

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथे एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, या घटनेला दीड महिना उलटूनही पोलिसांनी अद्याप संशयितांना अटक केलेली नाही. याबाबत लक्ष्मण खांडेकर यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली आणि आठ दिवसांच्या आत संशयितांना अटक न केल्यास जत येथील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
    तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी संशयित बेळयानसिद्ध शेंडगे व पवन सुभाष शेंडगे या दोघांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. यापूर्वी त्यांनी मुलीची छेड काढल्याची तक्रार देखील नोंदवली होती, त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
    खांडेकर यांनी सांगितले की, अपहरण करणारे युवक आणि त्यांचे कुटुंबीय राजकीय आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे मुलीच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. मुलीला ताब्यात देण्याची विनंती केली आहे. तसेच आठ दिवसांत कारवाई न केल्यास पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन