जाडरबोबलाद येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

 



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार जत तालुक्यातील जाडरबोबलाद या गावी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल साबळे तसेच तालुक्यातून सर्वच शाखाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    यावेळी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेला शेतकरी मेळावा, तसेच N.R.C.च्या विरोधात जत बंद करून प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. जत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता, तसेच बिलकिस बानू बलात्कार प्रकरणी त्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला होता. गायरान जमिनीवरती असलेल्या अतिक्रमण कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करून द्यावेत ही आमची रास्त मागणी सरकारने मान्य केली, असे अनेक जत तालुक्यातील विविध प्रश्नांवरती सर्वसामान्य जनतेचे हिताचे प्रश्न हे या प्रशासनाला व सरकारला वेळोवेळी निदर्शने, आंदोलने, रस्ता रोको, आमरण उपोषण करून वंचित बहुजन आघाडी ही पाठपुरावा करत असते म्हणून जत तालुक्याची सुज्ञ जनता ही या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर राहील असा विश्वास तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांनी व्यक्त केला. 
    आगामी जत विधानसभा निवडणुकीसाठी विठ्ठल पुजारी, प्रो. राजेंद्र कोळेकर सर, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज, पांडुरंग वाघमोडे सर, श्रीकांत होवाळे, संभाजी चंदनशिवे असे अनेक उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार असून यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा योग्य तो उमेदवार दिला जाईल असे संकेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळेस या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा विजयी होईल असा विश्वास तालुकाध्यक्ष अमोल  साबळे यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष