संखमधील बाबा आश्रममध्ये गुडडापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नदान; हभप तुकाराम बाबा यांचा उपक्रम

जतवार्ता न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रसह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षांप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोय संख येथील बाबा आश्रम येथे करण्यात आली. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री क्षेत्र संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. मागील दोन दिवसापासून हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. जतची श्री यलम्मा देवी व गुडडापुरची श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. पाच ते आठ लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात. सध्या श्री. दानम्मा देवीची यात्रा सुरू आहे. देवीच्या या कार्तिकी यात्रेला पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दे...