जत येथील स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट चतुर्थ वर्धापनानिमित्त दि.२ ते ५ डिसेंबर अखेरपर्यंत विवीध कार्यक्रमाचे आयोजन

 

जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
    श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने श्री.स्वामी समर्थ मंदिर चतुर्थ वर्धापनानिमित्त दि.२ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत विवीध कार्यक्रमाचे आयोजन.
    श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्याकडून श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या वर्धापनानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे मंदिर वर्धापनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झी.टी.व्ही.प्रस्तुत गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या धार्मिक कार्यक्रमाचे सोमवार दि.२ डिसेंबर ते गुरूवार दि .५ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
    सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.गितांजलीताई झेंडे (अहिल्यानगर) यांची श्री.महालक्ष्मी  महात्म्य ही कथा सांगीतली जाणार असून ,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांच्या किर्तनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
    आर.आर.काॅलेज पाठीमागील बाजूस असलेल्या राजे शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. सोमवार दि.२ डिसेंबर ते ४ डिसेंबर  अखेरपर्यंत सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत,दुपारी २.३० ते ४.३० व सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे (अहिल्यानगर) यांची महालक्ष्मी महात्म्य ही कथा होणार आहे. गुरूवार दि.५ डिसेंबर रोजी दिवसभर वरिल वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांची किर्तने होणार आहेत. 
    या संपूर्ण कथा व किर्तन महोत्सव कार्यक्रमादरम्यान सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
   श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार व श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे आधारस्तंभ झी.टी.व्ही.फेम ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.स्वामी समर्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
    दर पोर्णीमेला पहाटे अभिषेक व पूजा,त्यानंतर सकाळी दहा ते बारावाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम व नंतर दुपारी बारानंतर श्री.स्वामी समर्थचरणी पुष्पअर्पण कार्यक्रम व महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होत असतात. 
    या सर्व कार्यक्रमास श्री.स्वामी समर्थ भक्तांनी व भाविकांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार यांनी केले आहे.
    यावेळी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे उपाध्यक्ष श्री.अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, मोहन पवार, शहाजीबापू भोसले, दादासाहेब जाधव, गणेश सावंत, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, सदाशिव जाधव, अतुल मोरे, समर्थ पवार, वसंत उगळे आदी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन