चिक्कलगी भुयार येथे बिरोबा पालखीचे हभप तुकाराम बाबांनी केले जंगी स्वागत
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुलजंती येथील श्री महालिंगरायाची यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेपूर्वी श्री बिरोबा देवाच्या पालखी चिक्कलगी भुयार मठात आली असता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पालखीचे स्वागत केले. पालखीत सहभागी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री महालिंगराया यात्रेला निघालेल्या पालख्या चिक्कलगी भुयार येथे भेट देतात. चिक्कलगी भुयार मठ येथे श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या मंदिराला यंदाही श्री बिरोबा देवाच्या पालखीने भेट दिली. पालखी मंदिर परिसरात येताच पालखीने मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली. श्री बिरोबाच्या या पालखीचे वैशिष्ट म्हणजे पालखी ही तिच्या मर्जीप्रमाणे वाट काढते. पालखीच्या मनात आले तरच थांबते नाही तर वाट दिसेल त्या वाटेने धावत असते. चिक्कलगी भुयार मठाजवळ येताच आजपर्यत पालखी कधीही मंदिराला प्रदिक्षणा न घालता गेलेली नाही हे ही याचे वेगळे पण आहे. पालखी मंदिरात विराजमान होताच चिक्कलगी भुयार मठाचे महाराज भारत खांडेकर यांनी पालखीचे पूजन केले.
यावेळी बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, चिक्कलगी भुयार मठाला श्री बिरोबा देवाची पालखी प्रतिवर्षी येत असते. याही वर्षी पालखीचे स्वागत करण्यात आले. दुष्काळी जत व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ मिटू दे असे साकडे यावेळी श्री महालिंगराया व श्री बिरोबा देवाला घालण्यात आले.

Comments
Post a Comment