आ. सावंत यांनी जत तालुक्याच्या मूलभूत सुविधांबरोबर पायाभूत क्षेत्राचा विकास केला; डॉ.विश्वजित कदम
जतकरांनो सोलापूर पॅटर्न दाखवण्याची वेळ; खा. प्रणिती शिंदे
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ प्रचार शुभारंभ व जाहीर सभा
जतवार्ता न्यूज नेटवर्क(जॉकेश आदाटे);
जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या तालुक्याच्या विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी आज प्रचाराचा शुभारंभ जत येथील गांधी चौकातून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. मागील पाच वर्षात आ.सावंत यांनी विधानसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करत जत तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडली. राज्यात कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी मतदारांनी येत्या २० नोव्हेंबरला विक्रमसिंह सावंत यांना बहुमतांनी विजयी करून पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी, असे आवाहन माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, जतचे भूमिपुत्र असलेले विक्रमसिंह सावंत यांनी काँग्रेस पक्षाचा विचार पुढे नेत जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. सर्वसामान्य जनता व कष्टकरी शेतकऱ्यांना पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांबरोबर पायाभूत क्षेत्राचा विकास त्यांनी केला आहे. त्यांनी जत तालुक्याच्या पूर्व भागात तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणून जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.
यावेळी खा.प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या या लोकसभेत जनतेने दाखवून दिले इथे लोकशाही आहे हुकूमशाही नाही. तसेच लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायचा. आज प्रत्येक आईला विचार करावा लागतो कि माझी मुलगी कॉलेज वरून सुरक्षित येईल कि नाही हे सांगताना त्यांनी स्वतःचाच अनुभव सांगितला कि मी रेल्वे ने प्रवास करते तेव्हा माझे वडील माझी काळजी करतात जर माझ्या वडिलांना माझी काळजी वाटत असेल तर सामान्य जनतेमध्ये किती भीतीचे वातावरण असेल. तसेच या खोके सरकारने महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवाजी महाराज यांना देखील सोडले नाही महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाले त्यामुळे तो पुतळा खाली कोसळला. जसा तो पुतळा आतून पोकळ होता तसच हे सरकार देखील पोकळ आहे. यावेळी त्यांनी सोलापूर पॅटर्नची आठवण देऊन इथे जो उपरा उमेदवार लादला आहे. त्याच्या गावी पाठवा असे आवाहन केले. मला विक्रमदादांसोबत पाच वर्षं काम करण्याची संधी मिळाली. जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ते विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून उपोषण करत होते, असं मी स्वतः पाहिलं आहे. अशी लढणारी माणसं क्वचितच मिळतात. हे सांगून त्यांनी जतकरांना कळकळीची विनंती करून विक्रमदादांना मत देण्याचे आवाहन केले.
यावेळी आ. विक्रमसिंह सावंत म्हणाले की, २०१९ ते २०२४ या कालावधीत जत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रामाणिक प्रयत्न केले. जत तालुका राज्याच्या विधिमंडळातील शेवटचा मतदारसंघ असला तरी त्याला राज्यात स्वतंत्र ओळख नव्हती. या पाच वर्षांत २१४ प्रश्न मांडून तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली. अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. परंतु विधानसभेत ते आक्रमकपणे मांडून सरकारला त्यावर उपाययोजना करावयास भाग पाडले.
या तालुक्याला काय पाहिजे तर पाणी पाहिजे, आणि त्यासाठी आपण विधानसभेत अनेक वेळा प्रश्न मांडले तसेच आवश्यकता भासल्यास विधानसभेच्या पायऱ्यांवर उपोषण देखील केले आहे. त्या वेळी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून आपण दोन राज्यांमध्ये जत तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहोत. मात्र, अजूनही ही लढाई संपलेली नाही. जोपर्यंत तालुक्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. परंतु अडीच वर्षांपूर्वी काही आमदारांना ५० खोके देऊन सरकार पाडले गेले आणि महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आले, ज्यामुळे तालुक्याकडे दुर्लक्ष झाले. आगामी २३ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार येऊन जतसाठी कोट्यवधींचा निधी आणून तालुक्याला सुजलाम-सुफलाम करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी विवेक कोकरे, चिदानंद सौदी, बाबासाहेब कोडग, सुभाष पाटील, विजयराजे चव्हाण, रंजित बागल, अप्पराय बिराजदार, सुजय शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments
Post a Comment