जत येथे रिपाईच्या मेळाव्यात आमदार पडळकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार; सहसचिव संजयराव कांबळे
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राज्यातील उपेक्षित वंचित घटकाचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून वाचा फोडणारे नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर अशी ओळख आहे. जत तालुक्याला अशा नेतृत्वाला संधी देण्याचे भाग्य लाभत आहे. मागासवर्गीय दिन दलित घटकांचे प्रश्न आमदार पडळकरच सोडवू शकतील. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटातील सर्व मतदारांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे व त्यांना जत तालुक्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजयराव कांबळे यांनी केले.
जत येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप, शिवसेना (शिंदे)राष्ट्रवादी (अजित पवार) आरपीआय आठवले महायुतीचे उमेदवार आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित रिपाई कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार आ.गोपीचंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, शिवसेना शिंदे गट अंकुश हुवाळे हे प्रमुख उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर या मेळाव्यास संबोधित करताना म्हणाले, जत तालुक्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचबरोबर जत नगरपरिषद इमारत पाणीपुरवठा योजना मंजुरी मागासवर्गीय वंचित घटकांना घरकुल व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्यक्रमाने मिळवून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर व संविधानाचा आदर ठेवण्याचे मोठे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक १२५ वी जयंती साजरी केली, मुंबईमधील इंदु मिलची जागा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्म ठिकाण मध्यप्रदेश मधील महु हे गाव राष्ट्रीय स्मारक जाहीर केले. त्याचबरोबर बाबासाहेबांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अंबवडे याला राष्ट्रीय स्मारक जाहीर केले आहे. लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असणारे इमारत विकत घेऊन राष्ट्रीय स्मारक जाहीर केले . त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत जाताना व शपथ घेताना संविधानाची नतमस्तक होऊन जातात. त्यामुळे काँग्रेसपेक्षा बाबासाहेबांचा मान सन्मान मोदी यांनी ठेवला आहे . तरी आपण सर्वांनी मताधिक्य द्यावे असे आवाहन पडळकर यांनी केले.
यावेळी रीपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, प्रभाकर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, पंचायत समिती माजी सदस्य दिग्विजय चव्हाण, वाळेखिंडीचे सरपंच हिंगमिरे, एकुंडीच्या सरपंच निकिता कांबळे, कार्याध्यक्ष विनोद कांबळे आयट सेल अध्यक्ष बादल कांबळे, अजय वाघमोडे, विनोद विलास कांबळे, जावेद ऐनापुरे, लक्ष्मण कांबळे, अविनाश वाघमारे, राहुल वाघमारे, दुर्गापा ऐवाळे राजेश वर्मा, योगापा चलवादी बंडू कांबळे, अवांना कांबळे आदी उपस्थित होते .

Comments
Post a Comment