दलित महासंघ (मोहिते गट) जत तालुका अध्यक्षपदी नवनाथ पवार तर शहराध्यक्षपदी सिद्धेश्वर जाधव यांची निवड
दलित महासंघ मोहिते गटाच्या जत तालुकाध्यक्षदी नवनाथ पवार,शहराध्यक्षपदी सिद्धेश्वर जाधव यांची निवड करताना जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार,नितीन जाधव.
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
दलित महासंघ (मोहिते गट) जत तालुका अध्यक्षपदी नवनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका उपाध्यक्षपदी अतुल ऐवळे, तालुका कार्याध्यक्षपदी बापू साळे, जत शहर अध्यक्षपदी सिद्धेश्वर जाधव, जत शहर उपाध्यक्षपदी वैभव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
दलित महासंघ मोहिते गटाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते यांचे आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवडी केल्या आहेत.नुतन पदाधिकारी यांना निवडीचे पत्रे दिली.तसेच प्रत्येकी एक रोप देऊन संघटनेत स्वागत करण्यात आले.
निवडी नंतर बोलताना तालुकाध्यक्ष नवनाथ पवार म्हणाले येणाऱ्या काळात दलित महासंघ मोहिते गटाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू. यावेळी शहराध्यक्ष सिद्धेश्वर जाधव म्हणाले,जत शहरात नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्या नागरिकांना मिळवून देऊन त्यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार असे म्हणाले.

Comments
Post a Comment