निष्क्रिय गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना हटवा अन्यथा "कोंबडा धरणे" आंदोलन करणार; जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार

उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांना आनंद लोकरे यांना हटविण्याच्या मागणीचे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार..!

दलित महासंघ मोहिते गटाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मागणी

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जतचे निष्क्रिय गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी जतच्या गतिमान प्रशासनाला गतिरोधक लावण्याचे काम केले आहे. तेंव्हा आनंद लोकरे यांची चौकशी करून तात्काळ पदावरून हटवावे.अशी मागणी दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
     धोडमिसे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,जत तालुक्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या मोठी आहे. पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने येतात.मात्र पंचायत समितीत अधिकारी आवो-जावो घर तुम्हारा अशा पद्धतीने काम करीत आहेत. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
    अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुल योजना,नरेगा कामे,रोजगार हमीची कामे,पशुपालन कर्ज वाटप,बांधकामसह इतर विभागातील लोकहिताचे अनेक कामे रखडली आहेत.तालुक्यात गतिमान प्रशासनाला गतीरोधक लागल्याचे चित्र आहे.
     तेंव्हा जनहिताच्या दृष्टीने निरुपयोगी असणारे आनंद लोकरे यांची बदली गरजेची बनली आहे.येणाऱ्या काळात गतिमान प्रशासन जनतेच्या दारी घेऊन जाणारे गटविकास अधिकारी जतला हवे आहेत.याकडे लक्ष वेधण्यासाठी दि.9 जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम  मोहिते यांचे आदेशाने "कोंबडा धरणे" आंदोलन करणार असल्याचे प्रशांत केदार यांनी निवेदनात म्हंटले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन