योग हेच परमऔषध: डॉ. अमृतानंद स्वामीजी | जत येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा, हजारो साधकांचा सहभाग




जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    आज एकीकडे हॉस्पिटल व वैद्यकीय सुविधांची रेलचेल झाली असतानाही आरोग्याच्या समस्यांचा आलेखही वाढतच आहे. योग हे त्यावरील एकमेव परम औषधी आहे, हे भारत देशाने संपूर्ण जगाला पटवून दिले आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैलीसाठी योगाचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन श्री गुरुदेव आश्रम, बालगाव चे संस्थापक योगी डॉ. अमृतानंद स्वामीजी यांनी केले.
    योगी अमृतानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर भक्तीयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर, सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक रवींद्र आरळी, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, गट विकास अधिकारी आनंदा लोकरे, जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्रभाकर जाधव, चंद्रशेखर गोब्बी, पापा कुंभार, परशुराम मोरे, राजेंद्र माने, संभाजी कोडग, अनसार शेख, अतुल मोरे, विशाल वाघमारे, राजेश जीवान्नावर, दिनकर पतंगे, यशवंत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
    यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जत शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात योगाचा कार्यक्रम होत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला प्राचीन भारतीय योग परंपरेचे महत्त्व पटवून दिले, त्यामुळे आज जगभरात जागतिक योग दिन साजरा केला जातो, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. प्रारंभी पतंजली योग केंद्राच्या साधकांनी योगावर आधारित नृत्य अविष्कार सादर केला. जत शहर व परिसरातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक यांनी या योगामध्ये सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन