जत विकास सोसायटीच्या चेअरमन पदी प्रमोद सावंत तर व्हाईस चेअरमन पदी अण्णाप्पा माळी यांची बिनविरोध निवड

जतवार्ता न्यूज नेटवर्क;

    जत विकास सहकारी सोसायटी लिमिटेड जत या संस्थेच्या आज पार पडलेल्या चेअरमन व व्हाईट चेअरमन निवडीमध्ये संचालक प्रमोद विठ्ठलराव सावंत यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी संचालक हुवान्ना उर्फ अण्णाप्पा चन्नप्पा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष बोगार यांनी काम पाहिले. तसेच संस्थेचे मार्गदर्शक जतचे माजी आमदार विलासराव जगताप, सुरेश शिंदे हे उपस्थित होते. 
    यावेळी सर्व संचालकांच्या सहमतीने या निवडी बिनविरोध पार पडल्या. याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन प्रकाश देवकुळे, संस्थेचे संचालक माननीय मोहनभैय्या कुलकर्णी आप्पासो पवार, बसपांना बेडगे, विठ्ठलराव पवार, स्वप्निल शिंदे, मनोहर सावंत, अजित शिंदे, प्रतापराव शिंदे व महिला संचालक नदाफ मॅडम उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सचिव वसंत माने, क्लार्क दत्ताजीराव भोसले व जयप्रकाश पोतदार हे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन