जनसुराज्य कडून जत तालुक्यात विविध शाळांमध्ये वह्यांचे वाटप | प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम हाती; तालुका अध्यक्ष बसवराज पाटील
जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने जत तालुक्यातील एकुंडी, मेंढीगेरी, खलाटी, मुचंडी आदी गावांमधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करून वह्या वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.
या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. "विद्यार्थ्यांना वही देणे हा केवळ एक कार्यक्रम नसून, शिक्षणाचा दीप तेवता ठेवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे," असे बसवराज पाटील यांनी सांगितले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि त्यांच्या पालकांच्या मनात समाधान देणारा ठरला. शाळेतील शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व जनसुराज्यच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली.
समाजकार्याच्या माध्यमातून राजकारण हे परिवर्तनाचे साधन बनावे, ही समित कदम यांची भूमिका या उपक्रमातून प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.
"संस्कार! संकल्प!! सिद्धी!!" या ब्रीदवाक्याला अनुसरून जनसुराज्यचा हा सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतो आहे.
यावेळी रविंद्र शेगावे, राजू ऐवळे, मेंढीगेरीचे सरपंच सुभाष बिरादार, उपसरपंच श्रीदेवी कट्टीमनी, संजय नाईक, विजय नाईक, सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment