भावी पिढीला राजश्री शाहू महाराजांच्या कार्याची ओळख होणे गरजेचे; प्राचार्य डॉ.सुरेश पाटील


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    आज समाजामध्ये जातीयवाद आणि धर्मवाद वाढत चालला आहे. मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे  होत आहे. मानवता नष्ट होणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक आहे. चांगल्या समाजासाठी, सामाजिक समतेसाठी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे. राजश्री शाहू महाराजांच्या अफाट कर्तृत्वाची त्यांच्या मौलिक कार्याची आजच्या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ.सुरेश पाटील यांनी केले.
     ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या  प्रतिमेचे पूजन  महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यामंदिर हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सलगर चे माजी प्राचार्य श्री. प्रतापराव शिंदे, प्रा.श्रीमंत ठोंबरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 
    यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाने एक नवोपक्रम सुर केला असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रत्येक जयंती पुण्यतिथीचा  कार्यक्रम माजी विद्यार्थी व जत तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्याचा संकल्प केलेला आहे. यामुळे महाविद्यालयाची माहिती जत तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत व घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल व महाविद्यालयाप्रती सूचना मिळतील त्या नॅकला सामोरे जाताना उपयोगी पडतील.
    यावेळी बोलताना श्री.प्रतापराव शिंदे म्हणाले की, महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर व शैक्षणिक प्रगतीचा हेवा वाटतो. महाविद्यालयाने घेतलेली ही भरारी जत तालुक्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोणत्याही विद्यार्थीकेंद्री कार्यक्रमासाठी आम्ही माजी विद्यार्थी सढळ हाताने मदत करु असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन