दलित महासंघाचा प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात गाढव मोर्चा

 

जत प्रांत कार्यालवर गाढव मोर्चा नेताना संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते,जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार,परशुराम मोरे,सिद्धेश्वर जाधव,नवनाथ पवार.

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत शहरातून सांगोलकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 G या महामार्गाचे रखडलेले व चुकीचे काम तात्काळ दुरुस्ती करावी यासह विविध मागण्यांसंदर्भात आज दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते यांचे उपस्थित जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांचे नेतूत्वाखाली प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे  उपअभियंता खालिद शेख यांना निवेदन देण्यात आले.
     खालिद शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जत शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.965 G या हा जातो. या मार्गावर जत शहरातील विठलनगर परिसर आहे. या विठलनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गाने अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केले आहे.
     या भागात रस्ते डिव्हाडरचे काम चुकीच्या पद्धतीने केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे नाहीत. झेब्रा क्रॉसिंग नाही. दुभाजक नजीक ट्रॅफिक दिवा नाही. दिशादर्शक फलक नाहीत. भागात महामार्गावरील सर्व पथदिवे बंद आहेत. काही पथदिवे खांब उन्मळून पडलेले आहेत. सांगोल्याकडून येणाऱ्या वाहनांना दुभाजक स्पस्ट दिसत नसल्याने गंभीर अपघात होत आहेत. भागात शहरालगत मोठी वसाहत आहे त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. तसेच नगरपालिका प्रशासनाने सर्व सुविधा द्याव्यात. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व स्थानिक प्रशासन एकत्रित येत ठोस भूमिका घेऊन विठ्ठलनगर भागातील समस्या सोडवावेत.
     यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे, कार्याध्यक्ष नितीन जाधव, तालुकाध्यक्ष नवनाथ पवार, सिद्धेश्वर जाधव,अतुल ऐवळे, आनंद कांबळे, आनंद पाथरूट, किरण संकपाळ, अभिनंदन साबळे, वैभव जाधव, लकी पवार, सोहेल पवार, रोहित पवार आदी उपस्थित होते.

विठ्ठलनगर परिसरातील समस्या पाहून येत्या आठ दिवसात राष्ट्रीय महामार्गाचे चुकीचे व रखडलेले सर्व कामे मार्गी लावण्यात येतील.असे आश्वासन उपअभियंता शेख यांनी उपस्थित आंदोलकाना यावेळी दिले.

 

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन