२५ जून.. !!भारतीय लोकशाहीचा काळा दिवस!! जत शहर भाजपकडून भारतीय लोकशाहीचा काळा दिवस म्हणून काळ्याफिती लावून निषेध व्यक्त
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
आजच्या दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संविधानाची पायमल्ली करून, संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली. १९७१ साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर निवडणूकी मध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी खटला दाखल झाला होता. त्याचा निकाल१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात दिला. त्या रागापोटी श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती फकरूद्दिन अली अहमद यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून, संविधानाची पायमल्ली करून संपूर्ण भारतावर आणीबाणी लागू केली.
त्यावेळच्या विरोधी पक्षातील नेते विविध संघटनांनी या आणीबाणीचा विरोध केला. तेव्हा त्यांना मिसा कायद्याअंतर्गत जेलमध्ये टाकले गेले, त्यामध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, अभाविपच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना तसेच विविध संघटनांच्या नेत्यांना अटक केली व काही संघटनावर बंदी घालण्यात आली. त्या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होतं आहेत.
त्या अनुषंगाने घटनेच्या निषेधार्थ, आज भाजप जत शहर मंडलामध्ये भारतीय लोकशाहीचा काळा दिवस म्हणून पाळला गेला. यावेळी जत तालुका समन्वयक व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ रविंद्र अरळी, मंडल अध्यक्ष आण्णासाहेब भिसे, किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रविण वाघमोडे, भाजपाचे प्रभारी हेमंत भोसले, रोहित सांगोलकर, विशाल प्रधान, विनायक गारळे, हरिश चौगुले, राजेंद्र अरळी, चंद्रकांत पापा कुंभार, संतोष मोटे, किरण मामा शिंदे, दिपक शिंदे, विक्रम दादा ताड, गौतम ऐवळे, परशुराम मोरे, रमेश देवर्षी, योगेश एडके, अतुलजी मोरे, रवी मानवर, प्रकाश मोटे, राजू यादव, प्रमोद हिरवे, देवराज चव्हाण, अनंत वाघमारे, सुभाष कांबळे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment