जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना जत तालुका जनसुराज्य कडून वाढदिवसाच्या अनोख्या भेटवस्तूने शुभेच्छा



जतवार्ता न्यूज नेटवर्क;

    जनसुराज्य युवा शक्तीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका जनसुराज्य पक्षातर्फे अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र विधान भवनाची आकर्षक प्रतीकृती भेट देत त्यांचा सन्मान केला.
    या खास भेटवस्तूच्या माध्यमातून जत जनसुराज्य पक्षाने त्यांच्या भावनांची आणि श्रद्धेची अभिव्यक्ती करत समितदादांच्या नेतृत्वातील विधानभवनातील यशस्वी वाटचालीची प्रचिती दिली.
    यावेळी मनोहर पवार, राजू ऐवळे, प्रकाश करगणीकर, रविंद्र शेगावे, प्रमोद कोटगोंड, सुनिल आरगोडी यांच्या सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्षांनी तालुक्यातील संघटनात्मक कामांचीही माहिती घेतली आणि युवकांना मार्गदर्शन केले.
    “विधानभवन हे आमच्या स्वप्नांचे प्रतीक आहे आणि समितदादांसारखा अभ्यासू, दूरदृष्टी असलेला नेता त्या दिशेने आम्हाला घेऊन जात आहे,” असे मत अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन