निरंकारी मिशनच्या वतीने महाबळेश्वर - पाचगणी येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
   संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणासाठी 'बीट प्लास्टिक पोल्यूशन' या थीमवर देशभरातील १८ प्रमुख पर्वतीय पर्यटन स्थळांवर ५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळात एक व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
    त्यानुसार मिशनच्या सातारा झोनच्या वतीने पाचगणी व महाबळेश्वर मधील टेबल लाईन, ओल्ड महाबळेश्वर रोड, गोकुळ हॉटेल, शिवाजी नाका, बाय पॉईंट, वेंनालेखा पॉईंट, चर्चगेट, सरकारी हॉस्पिटल, पोलीस वसाहत इत्यादी ठिकाणी गुरुवारी (ता. 5) सकाळी ८ ते दुपारी २ या वेळात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची माहिती सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी दिली.
    या अभियानात बारामतीसह इंदापूर, फलटण, खंडाळा, शिरवळ, कोरेगाव, दहिवडी, सातारा, कराड, सांगली, आदी भागातून सर्व शाखांचे मुखी, संयोजक, निरंकारी मिशनचे स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्त्तगण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.
    या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. झांबरे म्हणाले महाराष्ट्रातील महाबळेश्वर पाचगणी सह आणखी चार ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचा सोहळा संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने साजरा करण्यात आला आहे. 
     श्री. झांबरे पुढे म्हणाले निसर्ग टिकला पाहिजे, आणि निसर्ग मध्ये प्रकृती जपली पाहिजे. कारण मानव हा सुद्धा प्रकृतीचाच एक अंग आहे. या प्रकृती मधूनच हा मानव बनला आहे. हे मानवाला कल्पना नाही आणि ही कल्पना देण्यासाठी निरंकारी मिशन जगामध्ये कार्य करत आहे. तसेच येणाऱ्या युवा पिढीला हा संदेश देण्यासाठी हे बिट प्लास्टिक पोल्युशन या थीमवर देशभरात ही मोहीम राबविण्यात आले असल्याचे सांगितले.
    या दरम्यान युवा स्वयंसेवक पथनाट्ये, सांस्कृतिक प्रस्तुती आणि रचनात्मक संदेशाच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाचा दुष्प्रभाव आणि त्यावरील उपाययोजनांची जनजागृती करण्यात आली. तसेच, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक व बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार करुन यावेळी समाजाला प्रेरणा दिली.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन