जत शहरातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन; प्रकाश व्हनमाणे


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुपणलिकेला अनेक ठिकाणी लागलेली गळती, त्यामुळे जत शहराला होणार अपुरा पाणीपुरवठा, शहरातील उद्यानांमध्ये लावण्यात आलेली खेळणी मोडकळीस आली आहेत. तसेच घंटागाड्यामार्फत शहरातील उचलला जाणारा कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. यासह विविध समस्यांबाबत जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना जत तालुका अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंचचे अध्यक्ष प्रकाश व्हनमाणे यांनी आज निवेदन दिले आहे.
    निवेदनात म्हटले आहे की, जत शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बिरनाळ तलावा पासुन ते जत शहराच्या पाणी टाकी पर्यंत अनेक ठिकाणी गळती लागली असुन त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. साठेलेले दुषित पाणी जत शहरास होणाऱ्या पाणी पुरवठा मध्ये मिसळत असल्याने जत शहरातील नागरीकांना दुषीत पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून जत शहरा मध्ये कावीळ, ग्रॅस्ट्रो, चिकनगुनिया या साथीच्या जनते मध्ये प्रार्दुभाव वाढत आहे.
    जत शहरा जवळ असणारा बिरनाळ तलाव पूर्ण क्षमतेने काटोकाट भरलेला असताना जत शहरातील नागरीकांना ५ ते ६ दिवसातुन एकदा पाणी सोडले जाते ते ही दुषीत पाणी दिले जाते. यावर ताबडतोब उपाय योजना करुन जत शहरातील नागरीकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करणेत यावा.
    जत नगर परिषद प्रभाग क्र.७ मधील मोरे कॉलनी येथे असणाऱ्या गार्डन मध्ये लहान मुलांना खेळणेसाठी बसविणेत आलेले झोपाळे, घसरगुंडी व गोल चक्र व गार्डनचे प्रवेशद्वारचे गेट या संपूर्ण साहित्याचे झीज होऊन मोडतोड झाली असली' ने तेथे खेळायला जाणाऱ्या लहान मुलाचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी वरील सर्व बाबींची ताबडतोब दुरुस्ती करुन गार्डन स्वच्छ करुन तेथे लाईटची व्यवस्था करणेत यावी.
    जत शहरा मध्ये कचरा गोळा करणाऱ्या गाड्या आहेत. त्या गाड्याचे चालक प्रत्येक नागरीकाचे घरातील कचरा घरोघरी गाडी थांबवुन कचरा उचलत नसलेने नागरिकांची गैरसोय होत आहे व घरोघरी कचरा साठुन राहिलेने रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आपणामार्फत कचरा गोळा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराना सक्त सुचना देण्यात यावेत.
    जत नगर परिषद मालकीचे असणाऱ्या ओपनपीस मध्ये काही नागरीकांनी व पदाधिकारी यांनी अतिक्रमण करुन नगर परिषद आपेनपीस वापरत असलेचे दिसून येते आहे. तरी अतिक्रमण करणाऱ्या लोकांचे वरती ताबडतोब कारवाई करुन ओपनपीस रिकामे करणेस भाग पाडावे जर या वरील सर्व बाबींची ताबडतोब कारवाई न झालेस दिनांक १५/०७/२०२५ रोजी पासुन प्रांताधिकारी यांचे कार्यालया समोर आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचे 
व्हनमाणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन