स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम ध्येय निश्चित करा; तहसीलदार प्रवीण धानोरकर

राजे रामराव महाविद्यालय, जत येथे विवेकानंद करियर अकॅडमीचे उद् घाटन


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ध्येय निश्चित केले पाहिजे. आपण ठरवलेल्या ध्येयाच्या जिद्दीने व आत्मविश्वासाने पाठलाग केला तरच यश मिळते असे प्रतिपादन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले. 
    ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या "विवेकानंद करिअर अकॅडमीच्या" उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. प्रारंभी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत यांनी आपल्या प्रस्ताविकात विवेकानंद अकॅडमी सुरु करण्याचा उद्देश सांगितला. 
     यावेळी पुढे बोलताना तहसीलदार प्रवीण धानोरकर  म्हणाले की, जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नका. परत नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. अनेक व्यक्तींनी अपयशातून धडा घेऊन यशाची उंच शिखरे गाठले आहेत. यशस्वी होण्यासाठी मनाला व शरीराला चांगल्या सवयी लावून घ्या. तुम्हाला जर प्रशासनात यायचे असेल तर स्वतः च्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगून एकाग्रता, संयम व आत्मचिंतन हीच यशाच्या जवळ घेऊन जाणारी त्रिसूत्री आहे असे ते शेवटी म्हणाले. 
     यावेळी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे आहे. कोणत्या क्षेत्रात जावा त्या त्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेची माहिती व्हावी व मनातील न्यूनगंड नाहीसा व्हावा म्हणून जत सारख्या ग्रामीण भागात विवेकानंद करियर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे, असे सांगून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन करावे असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रवींद्र काळे यांनी इतर शेवटी आभारप्रदर्शन प्रा.सरदार रोहिले यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन