सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी यांचा ग्रामपंचायत युनियनच्या वतीने सत्कार
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
पंचायत समिती जत अंतर्गत ग्रामपंचायत उटगी गावचे ग्रामपंचायत अधिकारी अरुण शिंदे, मोकाशवाडी गावचे संजय शिंदे व शंकर डोंबाळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम जत पंचायत समिती जत येथील सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी जत पंचायत समिती जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी माडगूळकर यांनी सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ग्रामीण भागातील विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी यांना पाहिले जाते. त्यांना कामकाज करित असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यातुन या ग्रामपंचायत अधिकारी यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो अदी मनोगत व्यक्त केले. यावेळी जत पंचायत समितीच्या वतीने विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव, युवराज मंडले तसेच ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष प्रविण देसाई, जिल्हा प्रतिनिधी यांनीही सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ उत्तमराव शिंदे, प्राध्यापक मधुकर शिंदे, दत्तात्रय साळे, दादासाहेब चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करुन उर्वरित आयुष्य सुखी समाधानी जावो या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन आर डी कांबळे यांनी केले. यावेळी जत युनियनचे तालुका अध्यक्ष अगतराव काळे यांनी कार्यक्रम उपस्थित सर्वांचे आभार मानले व सत्कार मुर्ती यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विस्तार अधिकारी तुळशीराम संकपाळ, पवनकुमार खराबे, कक्ष अधिकारी सुषमाताई मदने, अधिक्षक सचिन चव्हाण, कनिष्ठ लेखाधिकारी अविनाश कांबळे, संजय कोकरे, संतोष गरुड, युनियनचे तालुका सचिव राजेश ननवरे, उपाध्यक्ष दिलीप शिंगे, चंद्रप्रभा तिटकारे, कोषाध्यक्ष कादर नदाफ, जिल्हा कौन्सलर हुसेन पाटील, पैंगबर नदाफ, सुरेश खोत, सावळा करे, दत्तात्रय लेंडवे, साहिला मणेरी, पुष्पा गोडे, सुनिता सातपुते, लता केंगार, मनिषा अंबवणे, बापुसाहेब खरमाटे, दादासाहेब चव्हाण, संगाप्पा बसर्गी, महादेव शिलेदार, शिवाजी जाधव, सुदर्शन कांबळे, सुदर्शन जाधव, प्रसाद कुमार कपील वलकले, विलास भोसले, अशोक बिराजदार, प्रकाश चौगुले, शंकर जाणकार, दत्ता माने, ग्रामपंचायत अधिकारी पुजारी, जाविर, सन्नके, इरकर, म्हैत्रे, भंडेवाड, कोळी यांचेसह तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment