जिल्हा बँकेच्या जत तालुक्यातील कार्यक्षेत्रातील शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन; संचालक मन्सूर खतीब
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांच्या कार्य क्षेत्रातील 100 टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा मंगळवार रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांनी दिली.
खतीब म्हणाले की, जत तालुक्यातील बँकेच्या शाखा कार्यक्षेत्रातील विकास सोसायट्याच्या वसुलीसाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर बँकेच्या हिताचे काम करणारे पदाधिकारी सचिव व फिल्ड ऑफिसर हे योगदान देत आहेत, त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळे सर्वांनी राज डेकोरेट अँड इव्हेंट मँनेजमेंट हॉल, छत्रीबाग रोड जत येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन केले.
यावेळी खतीब यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महांडळ, ऍग्री क्लीनिक अँड अग्री बिजनेस सेंटर, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना व स्वयंसहाय्यता बचत गटांचे माध्यमातुन सक्षमीकरण याच बरोबर विविध योजना राबवण्याच्या प्रयत्न केला.
या सन्मान सोहळ्यास सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक, व्हा चेअरमन जयश्री पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती कजातीब यांनी दिली.
Comments
Post a Comment