जत येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विश्व आदिवासी दिनानिमित्त शहरातील आदिवासी पारधी समाजाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका व बांधकाम सभापती सौ. हेमलताताई बसवराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले. त्यांच्यासह अनेक आदिवासी महिला यावेळी उपस्थित होत्या.
भगवान बिरसा मुंडा व भारतीय संविधानास वेगवेगळ्या माध्यमातून आदिवासी महिलांनी अभिवादन केले. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि हक्क जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. उपस्थित महिलांनी आपल्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी आदिवासी पारधी समाजातील महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे व प्रशासनातील अधिकारी यांनी आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांना आदिवासी दिनानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment