जतला भाजपचा पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा

जत शहर महिला आघाडी उपाध्यक्षपदी हेमलताताई चव्हाण



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने भव्य पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यामध्ये जत शहर, जत पूर्व मंडळ, जत पश्चिम मंडळ व जत दक्षिण मंडळ विभागानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस महिला मोर्चा, युवा मोर्चा इत्यादी पदांचे पदग्रहण करून सर्वांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    पक्षाची विचारधारा, विकासाची दिशा आणि जनतेच्या अपेक्षा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटित, निष्ठावंत व एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. उत्साह, ऐक्य आणि बांधिलकीने भरलेल्या या मेळाव्यात भाजपा ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी, सुभाष गोब्बी, संजय तेली, सोमन्ना हाक्के, विठ्ठल निकम, अण्णा भिसे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर हेमलता ताई चव्हाण म्हणाल्या की मी यापूर्वी जत नगरपरिषद नगरसेविका व महिला बांधकाम सभापती म्हणून काम केले आहे. या निवडीनंतर देखील पक्ष वाढीसाठी तसेच  सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजातील व आदिवासी समाजातील महिलांना न्याय  देण्याचे काम कारेन.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन