जत येथे श्री.भाग्यवंती व मायाक्कादेवीचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प; बसवराज अलगुर महाराज

 

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत येथे श्री.भाग्यवंती देवी व श्री.मायाक्कादेवीचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प देवीचे पुजारी बसवराज अलगुर महाराज यांनी केला आहे. हे मंदिर उभारणी व धार्मिक कामी भाविकांनी मदत करावी असे आवाहन श्री.संत बागडे बाबा यांचे शिष्य व चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकारामबाबा महाराज यांनी केले.
   जत येथिल छत्रपती शिवाजीमहाराज चौकाजवळच देवीचे मंदिर असून या मंदीराचे पुजारी बसवराज अलगुर महाराज व सुवर्णाताई अलगूर महाराज देवींची नित्य पूजा करतात. वर्षभर मंदिर समितीच्यामार्फतच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी गुडीपाडव्याला यात्रा भरविण्यात येते या प्रसंगी देवीच्या मूर्ती पालखीत ठेवून पालखीची सवाद्य मिरवणूक जत नगरीतून काढण्यात येऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्री.क्षेत्र चिंचणी मायाक्का देवी यात्रेतील पालखीचा मान देवस्थान जतला दिला जातो.
     सद्यस्थितीत मंदिर छोटे असल्याने निवासाकरिता दुसरीकडे जागा घेतली असून सद्या आहे त्या संपूर्ण जागेवर देवीचे भव्यदिव्य असे मंदीर व सभागृह उभारण्याचा संकल्प अलगुर महाराज यांनी घेतला आहे. याचाच शुभारंभ म्हणून गेली एकवीस वर्षे सलग नवनाथ ग्रंथ वाचन व दोन वर्षापासून श्री.गुरूचरित्र वाचन करतात यासाठी शुक्रवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    शुक्रवारी पहाटे देवींना स्नान व अभिषेक महापूजा व नंतर आरती व नैवेद्य असा विधी पार पडला. सायंकाळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकारामबाबा महाराज व सांगली कृषीउत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती सुरेशराव शिंदेसरकार यांच्या हस्ते व जत नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती टिमू एडके, सामाजीक कार्यकर्ते संतोष मोटे, चंद्रकांत कुंभार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा मंदिर समितीच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
   यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व भाविक भक्तांनी मंदिर उभारणीकामी जी काही मदत लागेल ती आम्ही करू तुम्हीही या धार्मिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन