अचकनहळ्ळी येथील श्री.बिसलसिध्देश्वर देवाची सोमवारी यात्रा
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अचकनहळ्ळी येथील श्री.बिसलसिध्देश्वर देवाची यात्रा सोमवार दि.१८ ऑगस्ट रोजी भरविण्यात येणार आहे. जागृत व नवसाला पावणारे दैवत अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री.बिसलसिध्देश्वर देवाची यात्रा ही श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भरविण्यात येते.
श्रावण महिन्यात दररोज पहाटे हजारो भाविकभक्तांच्या उपस्थितीत अभिषेक पुजा करण्यात येऊन नंतर देवाची आरती होते. व देवाला नैवेद्य दाखविला जातो. उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले जाते. प्रत्येक श्रावण सोमवारी देवाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटतो.
यात्रेदिवशी पहाटे देवाचा रूद्राभिषेक करण्यात येणार असलेची माहीती पुजारी शिवशंकर कोरे, मनोज कोरे, चन्नाप्पा कोरे, उमेश कोरे, मल्लिकार्जुन कोरे, दिनेश कोरे यांनी दिली. दिवसभर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले असून यामध्ये धावण्याच्या स्पर्धा, सायकल स्पर्धा, जनावरे प्रदर्शन व निवड, धनगरी ओव्या स्पर्धा व कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.
यात्रेकरिता आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी यात्रा कमीटीच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोया केली असून जत एस.टी.आगारातून जादा बसची सोय यात्रेकरिता करण्यात आली आहे. तरी शेवटच्या श्रावण सोमवारी भरविण्यात येणा-या यात्रेला भाविकभक्तांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमीटीचे अध्यक्ष मधुकर शिंदेसर, उपाध्यक्ष दुंडय्या स्वामी, सचिव सिद्राया शिंदे, बसाप्पा कोरे, किसन शिंदे, सौ.सुनंदा कोळी, समाधान शिंदे आदीनी केले आहे.
Comments
Post a Comment