जतेत भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वतंत्र दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ७९ व्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त जत येथील नविन प्रशासकिय ईमारतीसमोरील खुल्या जागेत असलेल्या ध्वजस्तंभावर येथील उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांच्याहस्ते मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
    यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत व गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत म्हंटले. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावतीने त्यांच्या समर्थकांनी स्वतंत्रदिनानिमित्त शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जिलेबीचे वाटप केले. यावेळी प्रशासनाच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार प्रविण धानोरकर आदींच्या हस्ते जत तालुक्यातील स्वतंत्र सैनिकांचा व जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
    यावेळी महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे, माजी सैनिक सिध्दू शिंदे, पंडीत कोळी, धोडमाळ, केंद्रीय सिमेंट कार्पोरेशन चे संचालक डाॅ.रविंद्रआरळी, आर.पी.आय.आठवले गटाचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे, चंद्रशेखर  गोब्बी, रमेश बिराजदार, विक्रम ताड आदींसह मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
    जत शहरासह तालुक्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालये, हायस्कूल, ग्रामपंचायत, बॅंका, सोसायट्या पतसंस्था व विविध शासकिय कार्यालयात मोठ्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. स्वतंत्र दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देत हातात तिरंगा झेंडा फडकवित जत शहरातून प्रभात फेरी काढली.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन