शेगाव येथील चोरीचा मुद्देमाल मुजावर कुटुंबीयांना जत पोलिसांकडून सुपूर्द


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत तालुक्यातील शेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दि.७ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेत सुमारे १ लाख ४४ हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास झाले होते. याबाबतची फिर्याद मन्सुर बशीर मुजावर यांनी जत पोलिस ठाण्यात दिली होती.
     या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे व त्यांच्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी कसून तपास करत या चोरीचा छडा लावला. या चोरीतील सर्व मुद्देमाल चोरट्याकडून जप्त केला असून. न्यायालयाच्या आदेशानुसार मुजावर यांना मुद्देमाल  ताब्यात देण्यात आला आहे.
    यामध्ये ४५ हजाराचे नेकलेस , २५ हजाराचे  सोन्याचे मंगळसुत्र ,५० हजाराचे सोन्याचे टॉप्स,  २० हजारांच्या कानातील रींगा, ४ हजार ८०० रुपयांचे चांदीचे पैंजन असे एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी मुजावर यांच्या ताब्यात दिला. यावेळी मुजावर कुटुंबीयांनी जत पोलिसांचे आभार मानले. याप्रसंगी मरकज मस्जिद जतचे चेअरमन हाजी साहेब बंदेनवाज पटाईत, मेहबूब गवंडी, राजू इनामदार, रियाज शेख, इम्तियाज महात, बंडू शेख, अस्लम मुजावर, अमीर मुजावर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन