डफळापूर येथील आपलं धन पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

मोफत डोळे तपासणी शिबिर व विविध कार्यक्रम संपन्न



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    डफळापुर येथील आपलं धन पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सुदर्शन हॉस्पिटलचे डॉ. वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे श्री अमोल डफळे हे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते या डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक रुग्णांनी घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, डफळापुर येथील आपलं धन सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच चांगली प्रगती केली आहे. इथून पुढच्या काळातही या पतसंस्थेकडून ठेवीदारांना आकर्षक व्याजदरातून चांगला फायदा मिळवून देतील यात शंका नाही. यावेळी डफळापूरचे सरपंच, गावातील उद्योजक, व्यापारी व राजकीय मंडळी उपस्थित होते. डोळे तपासणी शिबिरात डपळापूर परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन