श्री संत बागडेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त राम चरितमानस कथेचे आयोजन | शनिवारी प्रारंभ; हभप तुकाराम बाबा यांची माहिती
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य वैराग्यसंपन्न श्री संत सद्गुरू बागडेबाबा यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्य चिक्कलगी भुयार मठ येथे श्री तुलसीदास कृत राम चरितमानस कथेचे आयोजन २२ ते २९ ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी सात ते दहा पर्यत आयोजित करण्यात आल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दादा काटे महाराज, अमृत पाटील जाल्याळ, काशीराम चौगुले, रेवनसिद्ध मलाबादी, राजू चौगुले, शिवराय हाताळी, रामलिंग मेडीदार, भारत महाराज खांडेकर, वास्तुशास्त्र तज्ञ सरिता लिंगायत, युनिक अँडव्हरटायझिंगचे प्रशांत कांबळे उपस्थित होते.
श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य दरवर्षी चिक्कलगी भुयार येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना येथील रामायण कथाकार हभप भगवानदास गोडसे यांच्या उपस्थितीत श्री तुलसीदास कृत राम चरितमानस कथा होणार आहे. २२ ऑगस्ट रोजी मंगलाचरण व शिवपार्वती विवाह, रामजन्म कथा, २३ ऑगस्ट रोजी अहिल्या उद्धार व सिता स्वयंवर, २४ ऑगस्ट रोजी राम वनवास व केवट प्रसंग, २५ ऑगस्ट रोजी श्री दशरथ महाराज स्वधाम गमन व राम- भरत भेट, २६ ऑगस्ट रोजी सीता अपहरण व शबरी भेट, २६ ऑगस्ट रोजी सुग्रीव- वाली युद्ध व लंका दहन, २८ ऑगस्ट रोजी राम- रावण युद्ध व रामराज्य अभिषेक रामायण कथा पार पडणार आहे. २९ ऑगस्ट रोजी नऊ त बारा दरम्यान रामायणाचार्य हभप भगवान गोडसे यांचे काल्याचे किर्तन, साडेबारा वाजता फुले व गुलाल वाहून सांगता होणार आहे. राम चरितमानस कथेला हभप अर्जुन भांगल, हभप कोरस नेमाने, हभप विजय, हभप श्रीराम गोडसे, हभप भारत महाराज माने हे संगीत साथ देणार आहेत. याच दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कथा काळात नित्यनियमाने सकाळी आठ वाजता विणा पूजन, दुपारी १२ वाजता नेमाचे भजन, सायंकाळी पाच वाजता हरिपाठ, सहा वाजता बाबांची आरतीव त्यानंतर कथेस प्रारंभ करण्यात आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
Comments
Post a Comment