महाविद्यालयीन जीवन म्हणजे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी; डॉ.रवींद्र आरळी
आर.आर.कॉलेजमध्ये सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाचे उद्घाटन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
महाविद्यालयीन जीवन हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून ते व्यक्तिमत्व घडविण्याची खरी सुवर्ण संधी आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांत सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली चे संचालक व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रवींद्र आरळी यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. भाग एक मधील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व उच्च शिक्षण प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे आजीव सेवक मा.कृष्णा बिसले, जत पदवीधर मतदार संघाचे समन्वयक प्रा.चंद्रसेन मानेपाटील, माजी फिजीकल डायरेक्टर प्रा.श्रीमंत ठोंबरे उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ.अरविंद पवार यांनी सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गाचा उद्देश विशद करुन सांगितला.
विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार सोडून प्रामाणिक प्रयत्न केले तर जीवनात अपयश कधीच येणार नाही, असे सांगून डॉ.रवींद्र आरळी यांनी नैतिक मूल्ये, समाजसेवा व देशप्रेम यांचा अंगीकार करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या इतिहासाची, शैक्षणिक प्रगतीचा व महाविद्यालयामध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमांची व विवेकानंद करियर अकॅडमीची माहिती देऊन नवागत विद्यार्थ्यांना शिस्त, कष्ट व आत्मविश्वास यांच्या बळावर यशस्वी होण्याचा संदेश दिला. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.अरविंद पवार यांनी तर सूत्रसंचालन प्रा.धनंजय वाघमोडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment