श्री.क्षेत्र बिसल सिध्देश्वरांच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी लोटला भक्तांचा महापूर
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत निगडीरोडवर जत शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर अचकनहळ्ळी गावचे हद्दीत श्री.बिसलसिध्देश्वरांचे प्राचीन असे मंदिर असून हे जागृत तिर्थक्षेत्र मानले जाते.
बिसल म्हणजे उन उन्हातील सिध्दपुरूष म्हणून श्री.बिसलसिध्देश्वरांकडे पाहीले जाते. या ठिकाणी श्री.सिध्देश्वरांनी तप करून सिध्दी प्राप्त केल्याने या तिर्थक्षेत्राला फार मोठे महत्व आहे. श्रावण महिन्यात दररोज पहाटे अभिषेक पूजा, त्यानंतर सकाळी सव्वा सहाला महापूर आरती व त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना फराळ वाटप असे दैनंदिन धार्मिक विधी पार पाडले जातात. दर्शनासाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविकभक्त मोठी गर्दी करतात. आजही हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री.बिसलसिध्देश्वरांची पूजा ही शिवशंकर कोरे,मनोज कोरे,चेन्नईच्या कोरे,उमेश कोरे,मल्लिकार्जुन कोरे,दिनेश कोरे यांच्यामार्फत श्रावण महिन्यात नित्य पार पाडली जातो.
पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविक-भक्त पायी चालत दर्शनासाठी येतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती. जत निगडीरोडवर दुचाकी, चारचाकी वाहनाबरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या स्पेशल बसमधूनही हजारो भाविकभक्त दर्शनासाठी आले होते. देवस्थान परिसर शेकडो वाहनाने व हजारो भाविकभक्तांनी गजबजून गेला होता.
श्री.बिसलसिध्देश्वरांचे दर्शन चांगल्या प्रकारे भाविकभक्तांना व्हावे यासाठी देवस्थान समिती अचकनहळ्ळी चे अध्यक्ष मधुकर शिंदेसर, सचिव सिद्राया शिंदे, खजिनदार बसवराज कोरे, सदस्य सिद्राया यमगर, श्रीरंग शिंदे, आण्णासाहेब शिंदे, किरण भोसले, सोमलिंग माळी,राम कुंभार, सागर सोलनकर व अचकनहळ्ळीचे माजी उपसरपंच समाधान शिंदे हे रात्रंदिवस झटत आहेत.
देवाची यात्रा ही श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी भरविण्यात येणार असून यात्रेचे संपूर्ण नियोजन व तयारी करण्यात आली असून भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी यात्राकमीटी दक्षता घेत असून यात्रेसाठी मोठ्यासंख्येने भाविकांनी उपस्थिती दाखवावी असे आवाहन श्री.बिसलसिध्देश्वर यात्रा समितीचे अध्यक्ष मधुकर शिंदेसर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment