माजी नगरसेवक साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त कॉलनी परिसरात वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम संपन्न


जतवार्ता न्यूज नेटवर्क: 
    काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय माजी नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग जत शहरातील प्रभाग क्र.२, दत्त कॉलनी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी वृक्षारोपणासह सुशोभिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. 
    कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या संदेशासह हा कार्यक्रम पार पडला. तसेच, या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे आणि कॉलनीतील रस्त्यांचे नामकरण करण्यात आले, ज्यामुळे परिसराला एक नवी ओळख मिळाली. प्रभागातील गल्लीच्या सुरुवातीला रस्त्याचे नाव आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची नावे असणारा फलक लावणेत आला.
    यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या कार्यक्षमतेचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि परिसराचा विकास साधण्यासाठी संतोष कोळी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींमुळेच खऱ्या अर्थाने परिसराचा विकास होतो.
    या खास प्रसंगी, प्रभागातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन संतोष उर्फ साहेबराव कोळी यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार केला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्काराने संतोष कोळी भारावून गेले आणि त्यांनी नागरिकांचे आभार मानले.
    या कार्यक्रमाला सभापती सुजय नाना शिंदे, डॉ. विजय पाटील, बाबासाहेब कोडग, तुकाराम माळी सर, दिलीप धोत्रे, निलेश बामणे, आण्णू बाबर, महेश पवार, बल्लारी, प्रमोद सावंत, शिवकुमार तंगडी, आप्पासाहेब चव्हाण यांच्यासह प्रभागातील अनेक प्रतिष्ठित आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या लोकप्रतिनिधीप्रती असलेली आस्था व्यक्त केली.


Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन