राष्ट्रवादीचे नेतृत्व जनतेच्या पाठीशी; जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पूर्व जत दौरा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) वतीने जत तालुक्यात भव्य मॅरेथॉन दौरा पार पडला. या दौऱ्याला तालुक्यातील तिकुंडी येथून सुरुवात झाली. त्यानंतर गुलगुंजनाळ, करेवाडी (को.बो.), कागनरी, पांडोझरी, कोणबगी, कोंतेव बोबलाद,करेवाडी (तिकोंडी), या गावांमध्ये भेटी देत थेट ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.
गावभेटीदरम्यान शेतकरी, महिला बचत गट, बेरोजगार युवक यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनी महागाई, शेतीमालाचे दर, अपुरी पायाभूत सुविधा, शिक्षण व नोकरीच्या संधींचा अभाव यांसारख्या गंभीर मुद्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी सरकारविरोधात जनतेचा तीव्र रोषही ठळकपणे दिसून आला.
या दौऱ्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत तालुकाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर खतीब, माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर होनमाने, युवक तालुकाध्यक्ष सचिन होर्तिकार यांनी केले.
यावेळी मनसुर खतीब यांनी सांगितले की,
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी आणि युवकांसाठी कर्ज योजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेच्या सहकार्याने अर्थसहाय्य देण्याचे कार्य पक्षाच्या माध्यमातून सातत्याने सुरु राहील.
या दौऱ्यात अमोल कराडे, सावकार गिरमाला रकटे, इराप्पा कराडे, सिद्धन्ना हदमाने, शंकर करे, संजय कराडे, दशरथ तांबे व अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये ताकदीने उतरेल. गावागावातील योग्य व्यक्तींना योग्य संधी देऊन जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे," असे सर्व नेतृत्वाने यावेळी ठामपणे सांगितले.
या दौऱ्यामुळे जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क अधिक बळकट झाला असून, ग्रामीण भागात पक्षाच्या प्रभावात लक्षणीय वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment