ऊस बांधावर नारळ रोपांची लागवड | राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत कुंभारी येथे राबविण्यात आला उपक्रम
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना व कृषी विभागामार्फत कुंभारी (ता. जत) येथे ऊस पिकाच्या बांधावर नारळ लागवड उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे व तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्या उपस्थितीत प्रगतशील शेतकरी माणिक आगतराव जाधव व कृष्णा आनंदा जाधव यांच्या उसाच्या बांधावर नारळ लागवड करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शेगाव बी. डी. धडस, उपकृषी अधिकारी शेगाव ए. ए. भोसले, कुंभारी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी पी. बी. शिंदे, कुंभारी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. ज्योती जाधव, उपसरपंच अजित सूर्यवंशी, ग्रामरोजगार सहाय्यक सुरज कुमार भाते, पिक स्पर्धा विजेते शेतकरी व माजी सरपंच दाजी पाटील, बापू जाधव, सविता जाधव, महादेवी कदम, संभाजी कदम, कृष्णा जाधव आदी मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या योजनेत गावातील ५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी २५ शेतकऱ्यांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. ११ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड पूर्ण केली असून त्या चे क्षेत्र हे ९.०५ हेक्टर आर आहे. या योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी या योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे व तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी केले.
Comments
Post a Comment