सौ. सरिता पंडित यांची राज्यस्तरीय पाठ्यपुस्तक समीक्षक पदी निवड


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत येथील शिक्षिका सौ. सरिता पंडित यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे प्रकाशित इयत्ता दुसरीच्या ई-पाठ्यपुस्तक 'शिकू मराठी आनंदाने' या पुस्तकांच्या समीक्षकपदी निवड झाल्याने. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ.वैशालीताई सनमडीकर, उपाध्यक्ष विशाल जाधव, सचिव डॉ.कैलास सनमडीकर व भारत साबळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.
    तसेच मुख्याध्यापक के. श्यामसुंदर यांनी सौ. पंडित यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि शैक्षणिक योगदानाचे मनापासून कौतुक करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले. यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक प्रमुख संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने ही त्यांचे अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीला नवे अधोरेखित स्वरूप मिळाले असून. सिद्धार्थ पब्लिक स्कूल परिवाराला या यशाचा मोठा अभिमान आहे असे मत डॉ.कैलास सनमडीकर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन