जत येथे संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २५१ जणांचा सहभाग
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत दिनांक ३ आँगष्ट २०२५ निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चँरिटेबल फौडेंशन शाखा जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणी ज्युनियर काॅलेज जत येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये २५१ रक्तदात्यांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला.
या शिबिराचे उद्घाटन संखच्या अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की रक्तदान शिबीराचे आयोजन करुन खऱ्या अर्थाने जण सेवेचे कार्य करित आहे. रक्तदान व आवयव दान यासारखे दान सर्वश्रेष्ठ दान आहे. अवयव दान केले नंतर आपला प्रत्येक अवयव कामाला येऊ शकतो अवयव दानाने आपण जिवंत राहू शकतो "मरावे परंतु किर्तीरुपी उरावे" या संताच्या वाक्यानुसार रक्तदान व आवयव दान केलेमुळे आपण अजरामर होऊ शकतो मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय विचारातुन बोलताना प्राध्यापक सुरेश पोळ म्हणाले की आध्यात्मिक जागृती बरोबर सामाजिक सेवेमध्येही रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्यशिबीर, स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत पाणीसाठा व नदीची स्वच्छता इत्यादी सामाजिक कार्यामध्येही मंडळाचे कार्य आहे. रक्तदान शिबिराची सुरवात सन १९८६ पासून सुरु आहे. दरवर्षी निरंकारी जगतामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. आजपर्यंत जवळजवळ १४ लाखाहून अधिक रक्त संकलन करून एक जागतिक इतिहास केला आहे. आज ५६ देशामध्ये मिशनचे कार्य सुरु आहे. त्यांनी मिशनचे कार्य व इतिहास सांगितला. राजेंद्रजी क्षिरसागर यांनीही मिशनचे कार्याविषयी माहिती दिली. प्रस्तावणा जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे यांनी केले, आभार सेवादल संचालक संभाजी साळे यांनी मानले, सुत्रसंचालन दत्ता साळे यांनी केले.
या कार्यक्रमास माझी नगरसेवक गिरमलतात्या कांबळे, संतोष मोटे, श्रीकृष्ण पाटील, हायस्कूलचे प्राध्यापक अमोल कळस्कर यांचेसह जत सांगली कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. रक्तसंकलन मिरज शासकीय रुग्णालयाचे डॉ यशवंत शेंडे(रक्तसंकलन अधिकारी) तसेच शासकीय रुग्णालय सांगलीचे डॉ रशिका सावंत(रक्तसंकलन अधिकारी)यांचेमार्फत करणेत आले. शिबिराच्या आदल्या दिवशी २ आँगष्ट रोजी जत शहर भागातुन भव्य अशा रँलीचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यास प्रेरित होऊन स्थानिक सामाजिक व आध्यात्मिक मंडळानेही रक्तदान शिबीर मध्ये सहभागी होऊन मानवाप्रिती सेवा समर्पित केली. या कार्यक्रम प्रसंगी जतचे उपविभागिय अधिकारी अजय कुमार नष्टे, तहसिलदार प्रविण धानोरकर यांनीही फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास एस.आर.व्ही.एम. हायस्कूलचेही मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे नियोजन सातारा झोनचे झोनल इंचार्ज नंदकुमार झांबरे, सांगली संयोजक जालिंदरजी जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सेवादल संत महापुरुष माता भगिनी यांनी केले.
Comments
Post a Comment